भुसावळ – रेल्वे कॉलनी परिसरातील पीओएच क्वॉर्टरमध्ये भरदिवसा घरात घुसून महिलेस चाकूचा धाक दाखवत सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह 63 हजार रुपयांचा ऐवज पळविण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील रेल्वे कर्मचार्यांच्या पीओएच कॉलनीतील आर.बी.2, 922 सी. मधील रहिवासी पूनम रामजी तिवारी (वय 50) या रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या घरात एकट्या असताना तीन अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करुन चाकूचा धाक दाखविला तसेच कपाटातील व अंगावरील सोन्याचे कानातील टॉप्स, सोन्याच्या दोन अंगठ्या, 30 ग्रॅम चांदीच्या तोरड्या, एक मोबाईल असा एकूण 63 हजार 800 रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. याबाबत पूनम तिवारी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात तीन अनोळखी तरुणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहे.