भुसावळात चाकू बाळगणार्‍या दोघांना अटक

भुसावळ : शहरातील मांगीलाल बिल्डींगजवळ अ‍ॅक्टिव्हा गाडीत धारदार चाकू बाळगतांना दोन जण मिळून आल्याने त्यांच्या विरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना दुपारी 1.30 वाजता घडली होती. बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जीवन कापडे, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, परेश बिर्‍हाडे यांनी शहरातील मांगीलाल बिल्डींगजवळ थांबत मिळालेल्या माहितीच्या आधारावर अ‍ॅक्टिव्हा (क्र.एमपी 09 जे.यु.5863) ही आली असता थांबवली आणि या गाडीच्या डीक्कीची तपासणी केली असता, यात धारदार चाकू मिळून आला. याप्रकरणी पोलिसांनी नवीन श्रावण टाक (रा. वाल्मीक नगर, भुसावळ) व युवराज चुनीलाल परदेशी (रा. शनि मंदीर वॉर्ड, भुसावळ) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चाकू व गाडी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास महेश चौधरी करीत आहे.