भुसावळ- महेश नगराकडे जाणार्या रस्त्यावरच चारचाकी उभी केल्याने झालेल्या वादातून चारचाकी चालक सतीश यादव बाविस्कर (43, काशीनाथ नगर, भुसावळ) यांच्यावर मंगळवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ तिघा संशयीतांनी चाकू हल्ला केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी योगेश देविदास तायडे (महेश नगर) व तुषार शंकर जाधव व मंगेश अंबादास काळे (कृष्णनगर, भुसावळ) यांना अटक केली होती. आरोपींना बुधवारी ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी घेण्यात आली.