भुसावळात चाकू हल्ला ; दोघे जखमी

0

भुसावळ– शहरातील जामनेर रोडवर कुठल्यातरी कारणावरून दोघांवर चाकूहल्ला झाल्याची घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात यश रामचंद्र शामनानी (वय 17, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) व त्याच्या सोबत असलेल्या प्रथम दीपक टेवानी (रा. सिधी कॉलनी) हे जखमी झाले. जखमी हे जामनेर ररस्त्यावर फिरत असताना त्यांचा सागर अशोक कोळी व त्याचा एक मित्र यांच्याशी वाद झाला. यावेळी सागर व त्यांच्या साथीदाराने धारदार वस्तूने टेवानीच्या कमरेखाली व बरगडीवर वार करून जखमी केले. यात प्रथम व यश दोन्ही जखमी झाले. सागर याने यश यांच्या डोक्यावर पाईपाने वार केला. संशयीतांचा कसून शोध सुरू आहे.