भुसावळात चाकू हल्ल्यात एक गंभीर

0

नाहाटा चौफुलीवर घटना; तीन संशयीत पसार

भुसावळ: शहरातील नाहाटा चौफुलीवर 29 वर्षीय इसमावर तिघांनी चाकू हल्ला करीत लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र पैसे देण्यास नकार देणार्‍या इसमाच्या बरगडीवर पोटावर व दंडावर चाकूचे सपासप वार करून आरोपी पसार झाले. मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ ही घटना घडली. या हल्ल्यात इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजारपेठ पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत. एका संशयीताला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करीत आहेत.