भुसावळात चारचाकी चालकावर चाकूहल्ला

0

भुसावळ : नाहाटा महाविद्यालयाजवळ उभ्या असलेल्या चारचाकी चालकावर अनोळखी इसमांनी चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. सतीश यादव बाविस्कर (22, काशीनाथ नगर, भुसावळ) असे जखमी चालकाचे नाव आहे. महामार्गाच्या कर्मचार्‍यांना नाहाटा चौफुलीवर क्रुझर वाहनातून सोडल्यानंतर बाविस्कर हे उभे असताना त्यांच्यावर अज्ञात तीन ते चार जणांनी चाकू हल्ला केल्याची माहिती आहे.