भुसावळात चार हजार 354 व्हीव्हीएम मशीन दाखल

0

भुसावळ- तहसील कार्यालयात 3 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या मतदानासाठी लागणारे बॅलेट व कंट्रोल युनीटची फस्ट लेव्हल चेकींग करण्याचे काम वेळेपूर्वीच पार पडले. 31 ऑक्टोबरपर्यत हे काम करायचे होते ते 26 ऑक्टोबरलाच पूर्ण झाले. याकाळात 11 हजार 842 मशीनची तपासणी करण्यात आली. दरम्यान, नुकतीच बंगलोर येथून निघालेली चार हजार 354 व्हीव्हीएम मशीनदेखील दाखल झाली आहेत.

जिल्ह्यासाठी लागणारे बॅलेट, कंट्रोल युनिट भुसावळात
संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रावर लागणार असलेले बॅलेट आणि कंट्रोल युनीट येथील तहसील कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले असून 24 तास पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे ठेवण्यात आलेल्या बॅलेट आणि कंट्रोल युनीटची तपासणी संपूर्ण जिल्ह्यभरातील प्रत्येक तहसील कार्यालयातील तहसीलदार व त्यांचे 10 कर्मचारी यांनी फस्ट लेव्हल चेकींग केली. यात चार हजार 354 कंट्रोल युनीट तर सात हजार 488 बॅलेट युनीट होते. त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीचे नियोजन 31 ऑक्टोबरपर्यत होते मात्र कर्मचारी संख्या वाढल्याने हे काम 26 ऑक्टोबर रोजीच पूर्ण झाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, सहायक समन्वयक तथा जिल्हा करमणूक कर अधिकारी महेश चौधरी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी काम पाहीले. जिल्हाधिकारी कीशोर राजे निंबाळकर यांनी येथील तपासणी केद्राला भेट देऊन पाहाणी करीत माहिती जाणून घेतली होती, त्याच्या सोबत निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे होते.