साडेआठ हजारांच्या रोकडवर डल्ला ; चोर्या वाढल्या
भुसावळ- शहरातील पत्री शाळेजवळील श्री दुग्धालय फोडून चोरट्यांनी साडेआठ हजारांच्या रोकडवर डल्ला मारला. शनिवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोर्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण नगण्य असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. हेमंत पुरूषोत्तम किरंगे यांच्या मालकिचे श्री दुग्धालय असून चोरट्यींनी शनिवारी मध्यरात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखत करण्यात आला. तपास हवालदार वसंत लिंगायत करीत आहेत. दरम्यान, चोरीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी भेट देत या परीसरातील फुटेजची पाहणी केली. चोरट्यांना लवकरच पकडू, असे त्यांनी सांगितले.