भुसावळात चोरट्यांनी मंदिरांना केले टार्गेट

0

पोलिसांची गस्त ठरतेय तोकडी : डिटेक्शन शून्य

भुसावळ : पोलिसांच्या गस्तीला आव्हान देत तापी नगर परीसरातील सप्तश्रृंगी मंदिरासह अन्य तीन मंदिरांच्या दानपेट्या फोडत चोरट्यांनी पाच ते दहा हजारांची रोकड लांबवली. शुक्रवारी पहाटे मंदिरात भाविक दर्शनासाठी आल्यानंतर चोर्‍यांचा उलगडा झाला. शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे.

शहरात पोलिसांची गस्त नावालाच ठरत असल्याचा प्रत्यय वारंवार नागरीकांना येऊ लागला आहे तर दुसरीकडे गुन्हे उघडकीस येण्याची प्रमाणही नगण्य असल्याने चोरट्यांचे फावले आहे. चोरीनंतर शहरचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले व सहकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.