भुसावळ : शहरातील हॉटेल प्रीमीयरजवळ मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणार्या संशयीतास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. रईस अब्दुल रहमान (26, रा.वडाला, नाशिक) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. बाजारपेठ पोलीस गस्तीवर असताना बुधवारी मध्यरात्री संशयीत अंधारात अस्तित्व लपवून असल्याने पोलिसांच्या पथकाने त्यास अटक करीत मुंबई पोलिस अॅक्ट कलम 122 (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.