भुसावळात चोरीच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक

0

भुसावळ । शहरात डिस्को टावर चौकात गस्त घालत असताना 19 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास एक अनोळखी इसम अंधाराचा फायदा घेवुन एका दुकानाच्या अडोशाला लपुन बसलेला दिसला तेव्हा त्याची विचार पुस करण्यासाठी गेले असता पोलीस आपल्याकडे येत आहे हे पाहुन त्याने पळ काढला तो पळत असल्याचे बघुन त्याच्या मागे लगेच वेळ वाया न घालता कॉन्स्टेबल श्रीकृष्ण देशमुख व पोलीस नाइक बंटी सैंदाणे यांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावरच त्याला ताब्यात घेतले व त्याची विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली तेव्हा त्याला परत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तेव्हा त्याने त्याचे नाव अक्षय प्रकाश छाटेकर (वय 20, रा.पाळधी बाजार पट्टा ता.जामनेर) असे सांगितले. तो शहरात एखादी मोठी चोरी किवा घरफोडी करण्याच्या उदेशाने फिरत असल्याचे समजले पोलिसांना ताब्यात घेतले.