भुसावळात चोरी : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

0

साई स्वीट दुकानातून सहा हजार पाचशे रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी लांबवले होते सिगारेट पाकिट

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील हसन अली प्लॉटमधील साई स्वीट दुकानातून चोरट्यांनी सहा हजारांंच्या रोकडसह सिगारेट पाकिटांची चोरी केली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली आहे. आरोपींनी जळगाव रोडवरील हुंडाई शो रूममध्येही चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या अटकेनंतर शहरातील अन्य चोर्‍यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.

गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
तक्रारदार मनोहरलाल संतुमल वत्यानी (रा.सिंधी कॉलनीा, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या जामनेर रोडवरील हसन अली प्लॉटमधील साई स्वीट दुकानातून चोरट्यांनी 9 ते 10 दरम्यान चोरट्यांनी सहा हजारांची रोकडसह चार हजार पाचशे रुपयांच्या रोकडसह गोल्ड फ्लॅक कंपनीची 50 सिगारेट पाकिटे अज्ञात चोरट्यांनी लांबवली होती. या प्रकरणी 13 रोजी बाजारपेठ पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्या गुप्त माहितीनुसार खडका चौफुली भागात काही संशयीत फिरत असल्याने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. किसन पन्नालाल धोबी (22, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) व योगेश दिनकर कोळी (18, रा.भारत नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, सहा.फौजदार तस्लीम पठाण, हवालदार सुनील जोशी, शंकर पाटील, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, दिनेश कापडणे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.