भुसावळात जगन सोनवणेंच्या मोर्चाने वेधले लक्ष

0

भुसावळ- शहरातील रीक्षा चालकांना आरटीओ विभागामार्फत करण्यात येणार्‍या दंडात्मक कारवाई विरोधा माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात लोकशाही पद्धत्तीने गेल्यो तीन दिवसांपासून आंदोलन छेडण्यात येत आहे. सोमवारी रीक्षा चालक मालकांसह जगन सोनवणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडपासून 150 रीक्षासह मोर्चा काढला. हा मोर्चा गांधी पुतळा, लोखंडी पूल, स्टेशन रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ताजोद्दीन बाबा दर्गा, रेल्वे स्टेशन समोर आल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी घोषणा देण्यात आल्या.

यांचा मोर्चात सहभाग
राष्ट्रीय रीक्षा-चालक मालक सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, जिल्हाध्यक्ष संजीव इंगळे, जीवन कोळी, आशिश बढे, साजीद शेख, धनराज लोणारी, राजेश सुर्यवंशी, सुनील ठाकूर, गणेश भोई, शुभम वैद्य, संगीता ब्राम्हणे, मनिष कुळकर्णी, नरेश सोनवणे उपस्थित होते. दरम्यान, 1 जुलै रोजी जळगाव येथील आरटीओ कार्यालयावर 20 हजार रीक्षांसह मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाचे रुपांतर नंतर आमरण उपोषणात करणार असल्याचे जगन सोनवणे यांनी सांगितले.