भुसावळात जनआरोग्य योजनेचा सर्वांना मिळणार लाभ

0

नगराध्यक्ष रमण भोळे ; जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थीना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डाचे वाटप

भुसावळ- गरीबांना उपचारासाठी आर्थिक पाठबळ न मिळाल्यास अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो तर कधी तर त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. या गोष्टीची जाणीव ठेवून शासनाने जनआरोग्य योजना सुरू केली असून शहरातील लाभार्थींना लाभ दिला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी येथे दिली. 1 मार्च रोजी महात्मा फुले नगरात आयोजित प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थीना आयुष्यमान भारत आरोग्य गोल्डन कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

आठ हजार कार्ड उपलब्ध
रमण भोळे म्हणाले की, भुसावळ शहरातील 11 हजार लाभार्थी परीवारापैकी आठ हजार लाभार्थींचे कार्ड आले असून उर्वरीत परीवाराचे कार्ड सुद्धा पूर्तता करून लवकरच येणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून विविध आजारावर शासन प्रत्येकी पाच लाख उपचारासाठी देणार आहे. खर्‍या गरजवतांसाठी ही योजना असून गरज पडल्यास अन्य शहरात सुध्दा या कार्डाचा वापर करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रतिभा पाटील, पिंटू ठाकूर, सुषमा पाटील, हाजी आशिक खान, मुकेश पाटील, देवेंद्र वाणी, राजेंद्र आवटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.तौसीफ खान, डॉ.अतिया खान, नृपाली सावकारे, आर्शिया शेख, कर्मचारी अंबादास घायवट, नितीन पाटील, अर्चना चौधरी यांच्यासह कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.