भुसावळात जप्त वाहनांच्या विक्रीतून 74 हजारांचा महसूल

0

भुसावळ- शहर व बाजारपेठ पोलिसांना शहरातील विविध भागात एकूण 17 बेवारस दुचाकी आढळल्या होत्या तर वारंवार आवाहन करूनही मूळ मालक समोर न आल्याने या भंगार वाहनांचा शुक्रवारी सकाळी जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात लिलाव करण्यात आला. तत शहर पोलिसांच्या हद्दीत सापडलेल्या 10 वाहनांच्या लिलावापोटी 34 हजार तर बाजारपेठ पोलिसांंच्या हद्दीतीत सात वाहनांच्या लिलावापोटी 40 हजारांची रक्कम प्राप्त झाली. ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड म्हणाले. याप्रसंगी बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, शहरचे बाबासाहेब ठोंबे, एएसआय एजाज पठाण, समाधान पाटील व कर्मचारी उपस्थित होते.