भुसावळात जबरी लूट : दोघे आरोपी जाळ्यात

0

जळगाव गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई

भुसावळ : जबरी लूट प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल दोन स्वतंत्र गुन्ह्याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. इम्रान शेख इक्बाल व सय्यद अफताब सय्यद अरमान (मुस्लिम कॉलनी, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून बळजबरीने हिसकावण्यात आलेले दोन मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, रणजीत जाधव आदींच्या पथकाने केली. आरोपींच्या अटकेमुळे अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.