भुसावळात जिम ट्रेनरची हत्या, हत्येचे सत्र थांबेना
( शहरवासीयांमध्ये भितीचे वातावरण - गुन्हेगारांचा बिमोड करण्याची मागणी )
भुसावळ । प्रतिनिधी
भुसावळ शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्या व हत्येचे सत्र सुरू असल्याने शहरवासीयां मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . त्यातच आज पहाटे भरवस्तीत एका जिम ट्रेनरची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे .
भुसावळ शहराची देशभरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक म्हणून ओळख निर्माण झाली आहे . मात्र, त्याच प्रमाणे गुन्हेगारीचे जंक्शन शहर म्हणूनही ओळख निर्माण होत आहे . या शहरात वर्षभराच्या कालावधीत अनेक चोऱ्या, हाणामाऱ्या व हत्येचे प्रमाण वाढले असून पोलीस प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसुन येत असल्याने गुन्हेगारांची ताकद वाढत आहे . यामध्ये नुकतेच कुख्यात निखील राजपूतच्या हत्येला काही दिवसाचा कालावधी होत नाही तोच आज पहाटे खडका रोडवरील भरवस्तीत शेख नाजीर शेख नशीर ( वय – ३१ ) या जिम ट्रेनरची धारदार शस्त्राने हत्या झाली . या हत्येची वार्ता शहरात वाऱ्या सारखी पसरताच एकच खळबळ उडाली आहे . तर हि हत्या पूर्ववैमन्यस्यातून झाल्याची चर्चा असुन पोलीसांनी गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे .
(जाहीरात )
♦️गुन्हेगारांचा बिमोड करण्याची मागणी♦️
शहरात पोलीसांचा वचक संपल्याचे दिसुन येत असल्याने अनेक गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचे दिसत आहे . यामुळे शहरातील व्यापारी वर्ग व सर्व सामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलीसांनी अट्टल गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे .