भुसावळात जुगाराचा डाव उधळला : दहा जुगारी जाळ्यात

0

भुसावळ- शहरातील दिनदयाल नगर भागातील सार्वजनिक जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर गुप्त पद्धत्तीने टाकलेल्या धाडीत दहा जुगार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून मोबाईल, पत्त्याची कॅट व रोकड मिळून 29 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींना अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

या जुगार्‍यांना पोलिसांनी केली अटक
अटकेतील आरोपींमध्ये तस्लीम शहा जफर शहा (30, लेंडीपूरा) मेहबूब शहा मस्तान शहा (40), जयसिंग नारायणसिंग राजपूत (43), हसन शहा शकीर शहा (28), मौसीम शहा सलीम शहा (22), आरीफ खान ताहेरखान (40), ईरफान शहा ईस्माईल शहा (28), आरीफ बेग हमीद शेख (32), सलीम शहा मेहमूद शहा (32), समीर शहा मुन्ना शहा (24, सर्व रा.दीनदयाल नगर, भुसावळ) यांना पोलिसांनी अटक केली. जुगार्‍यांविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल वसीम सलीम शेख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर आरोपींची गुरूवारी जामिनावर सुटका करण्यात आली.