भुसावळात जुगाराचा डाव उधळला : सहा जुगारी जाळ्यात

0

भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर भागातील गब्बर चावरीया यांच्या घरामागे जुगाराचा डाव सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत सहा जुगारींच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी दुपारी 2.20 वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत 11 हजार 390 रुपयांची रोकड तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

या आरोपींना झाली अटक
बाजारपेठ पोलिसांच्या कारवाईत विकास वसंत वलकर (32), अजय दीपचंद बोयत (38), करण गोपाल ढोलपुरे (25), हेमंत रमेश ढिंक्याव (30), राहुल अशोक टाक (30), आकाश रायसिंग पंडित (24, सर्व रा.वाल्मिक नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली. आरोपी झन्ना-मन्ना नावाचा माग पत्यावर जुगार पैशाने खळताना आढळले तसेच आरोपींच्या ताब्यातून 11 हजार 390 रुपयांची रोकड तसेच जुगाराची साधने जप्त करण्यात आली. हीक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, नाईक रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, आकाश सुरळकर आदींनी केली.