भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल हेवन जवळील दीनदयाल नगर परीसरात झन्ना-मन्ना जुगाराचा डाव सुरू असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्याने टाकलेल्या छाप्यात चौघांना अटक करण्यात आली तर जुगाराच्या साहित्यासह एक हजार 750 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास करण्यात आली. संजय भदाणे यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी शरीफखान टायरखान, आरीफ शेख हमीद, मनोहरशा मासुमशा फकिर, शे.साजीद शे.अकबर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. तपास निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक चौधरी करीत आहेत.