भुसावळ- शहरातील कन्हैय्याकुंज हॉटेलजवळ जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून रविवारी सकाळी दहा वाजता बाजारपेठ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सात जुगार्यांना पकडण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून पाच हजार 110 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये शेख समीर अब्दुल गणी (36), जाबीर शेख जाफर शहा (40), फरीद गणी पिंजारी (30), इम्रान सय्यद सरवर (35), आसीफ अली निसारअली (48), शेख हनीफ उर्फ राजू शेख निसार (42), शेख रशीद शेख मासुम (30, सर्व रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्रात्रय गुळींग, पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, तस्लिम पठाण, यासीन पिंजारी, कॉन्स्टेबल समाधान पाटील, विकास सातदिवे आदींच्या पथकाने केली. तपास यासीन पिंजारी करीत आहेत.