भुसावळात जुन्या वादातून तरुणावर चाकुहल्ला

0

भुसावळ- शहरातील नाहाटा चौफुलीजवळ गो -शाळेजवळ जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तिघे हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा बाजारपेठ पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेत दर्शन सुरेश ठाकूर (22, नेब कॉलनी, भुसावळ) हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयीत आरोपी गोलू उर्फ दानीश (पूर्ण नाव माहित नाही) व त्याच्या सोबतच्या अन्य दोन अनोळखी आरोपींनी ठाकूरशी जामनेर रस्त्यावरील गो -शाळेजवळ वाद घातला तर दानीशने आपल्याजवळील चाकूने हल्ला केल्याने दर्शनच्या डाव्या दंडाला दुखापत झाली. जखम तरुणाने बाजारपेठ ठाणे गाठल्यानंतर त्यास उपचारार्थ गोदावरीत हलवण्यात आले. एएसआय एजाज पठाण, हवालदार माणिक सपकाळे, चालक तस्लीम पठाण, राहुल चौधरी, उमाकांत पाटील यांनी जखमीचा जवाब नोंदवला.