चारचाकीला कट लावण्याचा बहाणा करीत चालकाला मारहाण करीत लुटली पाच हजारांची रक्कम
भुसावळ- ओरीसाहून मुंबईतील तळोजा येथे लोखंडी पत्र्यांचे रोल घेवून जाणार्या ट्रक चालकाला वांजोळा रस्त्यावर अडवत चारचाकीला कट मारल्याचे निमित्त करून लुटणार्या भुसावळसह जळगावातील चौघा आरोपींच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या आहेत. मंगळवारी दुपारी दुपारी गुन्हा घडत असतानाच बाजारपेठ पोलिस आल्यानंतर त्यांच्याशी आरोपींनी झटापट केल्याने त्यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 25 रोजी पहाटे दिड वाजेच्या सुमारास वांजोळा फाट्याजवळ घडलेल्या या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून लुटीतील रक्कम जप्त केली आहे.
कट लागल्याचे निमित्त करून लुटले
डाडमिया, ता.शेरगड येथील ट्रक मालक रमेश कन्हाराम यांच्या मालकीचा ट्रक (आर.जे.19 जी.एफ.2555) मध्ये लोखंडी रोल पत्रा घेवून ट्रक चालक उकाराम बळाराम वलवाडी (गुडानाल, ता.सिवाना, बाडमेर, राजस्थान) ओरीसा ते मुंबईतील तळोजा असा प्रवास करीत असताना मंगळवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वांजोळा फाट्याजवळ चारचाकी (एम.एच.15 सी.टी.9223) मधून आलेल्या चौघा आरोपींनी चारचाकीला कट मारल्याचे निमित्त करून ट्रक अडवला. अचानक चौघा आरोपींनी ट्रक चालक उकाराम वलवाडी यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या खिशातील पाच हजारांची रक्कम बळजबरीने काढून घेतली. या प्रकाराची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली मात्र आरोपींनी तेथेही पोलिसांशी झटापट केली.
पोलिस निरीक्षकांनी अखेर आवळल्या मुसक्या
पोलिस कर्मचार्यांनाही न बदणार्या आरोपींच्या अखेर पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी मुसक्या आवळत त्यांना पोलिसी खाक्या दाखवत पोलिस ठाण्यात आणणण्यात आले. संशयीत आरोपी राहुल भानुदास कुलकर्णी (म्हाडा कॉलनी, भुसावळ), सौरभ विश्वनाथ कुटे (मामाजी टॉकीज, कुटे गल्ली), धनराज देविदास चौधरी व मंगेश सुरेश नपटे (संतोष आप्पा नगर, जळगाव) अशा चौघांना अटक करण्यात आली. एएसआय तस्लिम पठाण, हवालदार सुनील जोशी, छोटू वैद्य, नंदलाल सोनवणे, पोलिस नाईक किशोर महाजन, पोलिस कॉन्स्टेबल विकास सातदिवे आदींनी आरोपींना ताब्यात घेत बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. तपास एएसआय अनिल अडकमोल करीत आहेत. दरम्यान, अटकेतील काही आरोपींविरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.