भुसावळात डंपर लांबवले : दोघा आरोपींना अटक

0

भुसावळ- तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूने भरलेले डंपर लांवणार्‍या संदीप अरविंद पाटील (24, रा.कांचन नगर, जळगाव) व मंगल देविदास कोळी (35, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ, साकेगाव) यांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. 1 सप्टेंबर रोजी महसूल प्रशासनाने वाळूचे डंपर जप्त केल्यानंतर चार डंपर चालकांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून लांबवले होते. या प्रकरणी शहर पोलिसात 12 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.