भुसावळ- तालुक्यातील सर्व विभागातील डीसीपीएस धारक शिक्षकांतर्फे 2 ऑक्टोबर 2018 रोजी जुन्या पेंशनसाठी व वरीष्ठ वेतनश्रेणीचा 23/10 चा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी महाआंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून गुरूवार, 20 रॅली दुपारी वाजता यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यापासून ते माध्यमिक सोसायटीपर्यंत काढण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात रन फॉर पेंशनचे आयकॉन प्रदीप सोनटक्के हे आंदोलन जागृती आपल्या धावण्याने करणार आहेत. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त भुसावळ तालुका जुनी पेंशन हक्क संघटन तालुकाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तृप्तीराम करनकाळ यांनी केले आहे.