भुसावळात डेंग्यूच्या सात रुग्णांवर खाजगी दवाखान्यात उपचार

0

भुसावळ- शहरासोबतच तालुक्यातही डेंग्यूने पाय फैलावायला सुरुवात केली असून शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील डॉ.राहुल जावळे यांच्या सनराईज हॉस्पिटलमध्ये सात जणांवर डेंग्यूचे उपचार सुरू आहेत. रक्त चाचणीत त्यांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. तनय कोल्हे (14, रा.फुलगाव), दीपाली पाटील (16, रा.सुसरी), कैलास माळी (36, रा.वरणगाव), आशिष सुंदरानी (23, रा.सिंधी कॉलनी भुसावळ) आणि कृणाल आहुजा (18), निखील आहुजा (22) व अंजू आहूजा (40, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यात एका परीवारातील तिघांचा समावेश आहे. या रुग्णांवर दोन दिवसांपासून उपचार सुरू असल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून कैलास माळी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती डॉ.जावळे यांनी दिली.