भुसावळात ड्रेनेज कामासाठी वाहतूक वळवली

0

वाहनधारकांचे हाल ; सायंकाळी मिळाला दिलासा

भुसावळ- ड्रेनेजच्या कामासाठी शनिवारी शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून येणारी वाहने ही थेट बसस्थानकातून वळविण्यात आल्याने वाहनधारकांची चांगलीच गैरसोय झाली. सायंकाळी सहा वाजता रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला. रेल्वे स्थानकावरील पाणी व रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शनिवारी ड्रेनेजचे काम करण्यात आले. दिवसभरात पाईप लाईन टाकण्यात आली. रस्ता बंद असल्यासंदर्भात फलक लावण्यात आला होता.