भुसावळात तरुणावर गोळीबार ?

0

भुसावळ : शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ अज्ञात कारणावरून 20 वर्षीय तरुणावर गोळीबार घटना गुरुवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबारात आदित्य लोखंडे (20) नामक तरुण जखमी झाला असून त्यास गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. गोळी तरुणाच्या कानाला स्पर्श करून गेली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराची माहिती कळताच शहरचे पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळ गाठले. गोळीबार नेमका कुणी वा केला ? याची माहिती काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी व सहकारी हे गोदावरी रुग्णालयात जखमीकडून माहिती जाणून घेण्यासाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे म्हणाले की, गोळीबार झाला आहे अथवा नाही? याबाबत आम्ही खातरजमा करीत आहोत. जखमीचा जवाब नोंदवल्यानंतर व वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्याबाबत काही सांगता येईल, असेही ते म्हणाले.