भुसावळात तरुणावर चाकूहल्ला

0

भुसावळ : रस्ते बंद झाल्याच्या वादातून शहरातील कडू प्लॉट भागातील 26 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षकक वैभव पेठकर, हवालदार मो.वली सैय्यद, संजय पाटील, सोपान पाटील आदींनी घटनास्थळी जावून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार 26 वर्षीय तरुणाचा तीन ते चार संशयीतांशी वाद झाल्याने या तरुणावर आरोपींनी चाकूने हल्ला केला व संशयीत पसार झाले. जखमीने शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यास मेमो देवून गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.