भुसावळ : घरासमोर लावलेली बल्ली का काढली? या कारणावरून वाद घालत चौघा आरोपींनी पाटीवर, पोटावर व डोक्यावर मारहाण करून पार्श्वभागावर चाकू मारल्याची घटना मंगळवारी रात्री 7.30 वाजता शहरातील कडू प्लॉट भागात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर अन्य तीन संशयीत आरोपी पसार झाले आहेत. कन्हैय्या हरणे असे जखमीचे तर हरी महाजन असे अटकेतील आरोपीचे नाव असून अन्य
चाकू हल्ल्याने शहरात उडाली खळबळ
तक्रारदार कन्हैय्या सीताराम हरणे (भोई, रा.कडू प्लॉट, भुसावळ) यांनी आरोपींच्या घरासमोर लावलेली बल्ली काढल्याने त्याबाबत आरोपींनी येवून विचारणा केली तर आरोपी क्रमांक एक व दोनने शिवीगाळ करून पोटावर, पाठीवर, डोक्यावर मारहाण केली तर आरोपी क्रमांक तीन व चारने फिर्यादीच्या पार्श्व भागावर चाकू मारून दुखापत केली. चाकू हल्ल्याची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, उपनिरीक्षक वैभव पेठकर, हवालदार मो.वली सैय्यद, संजय पाटील, सोपान पाटील आदींनी घटनास्थळी जावून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जखमीने शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यास मेमो देवून गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले व रात्री आलेल्या जवाबानुसार संशयीत आरोपी हरी मधुकर महाजन (41), गोविंदा महाजन, योगेश गोविंदा महाजन, भरत गोविंदा महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत. दरम्यान, आरोपी हरी महाजन यास अटक करण्यात आली असून अन्य आरोपी पसार झाले आहेत.