भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत ; आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- शहरवातील आठवडे बाजार परीसरातील डिस्को टॉवर परीसरात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या प्रवीण काशिनाथ पाटील (42, कलानगर वांजोळा रोड, प्लॉट नंबर सात, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांच्या अवैधशस्त्र जप्त पथकाने अटक केली. आरोपीच्या ताब्यातून 500 रुपये किंमतीची व 22 इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज अहिरे, मनोज ठाकरे, सुनील सैंदाणे, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव आदींनी कारवाई केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार युवराज नागरुत करीत आहेत.