भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत ; एकाला अटक

0

भुसावळ- शहरातील जाममोहला भागातील अंजुमन शाळेसमोर तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या तौसीफ ऊर्फ गजनी रफीक खान (20, रा.जाममोहल्ला, अंजुमन शाळेजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधशस्त्र जप्त पथकातील उपनिरीक्षक युवराज अहिरे, सुनील सैंदाणे, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील आदींनी केली. आरोपी तौसीफच्या ताब्यातून एक हजार 500 रुपये किंमतीची दोन फुट आठ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली. गुन्ह्याचा तपास हवालदार सैय्यद अली मोहम्मद अली करीत आहेत.