बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; तलवार केली जप्त
भुसावळ- शहरातील मातृभूमी चौकात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या नकुल ठाणसिंग राजपूत (28, आनंद नगर, शिवगंगा चौक, भुसावळ) यास अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नागरूत, संजय भदाणे, अनिल पाटील, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, रवींद्र तायडे, चालक तस्लीम पठाण आदींनी ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून 400 रुपये किंमतीची 23 इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली. तपास हवालदार युवराज नागरूत करीत आहेत.