भुसावळ : शहरातील टेक्नीकल हायस्कूल परीसरात तलवारीच्या धाकावर एक संशयीत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेत आरोपी संदीप उर्फ सॅण्डी प्रकाश मोरे (30, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) यास अटक केली. शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, शहर पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील सुनील (बंटी) सैंदाणे, साहील तडवी, संदीप बडगुजर, जितेंद्र सोनवणे, जुबेर शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.