भुसावळात तलवार पकडली ; आरोपी जाळ्यात

0

भुसावळ- शहरातील श्री राम नगर भागातील श्री राम मंदिरा जवळ तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या सुरज भवरीलाल भट (33, रा.श्रीराम नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली. ही कारवाई रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हवालदार युवराज नागरुत, तस्लीम पठाण, नरेंद्र चौधरी, सुनील थोरात, संजय भदाणे, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, उमाकांत पाटील, प्रशांत चव्हाण आदींच्या पथकाने केली.