भुसावळ : बाजारपेठ पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात हिस्ट्रीशीटर तस्लीम सलीम शेख उर्फ तस्लीम काल्या (26, दिनदयाल नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी लूट प्रकरणाचा तपास करताना गावठी कट्ट्यासह रविवारी रात्री अटक केली होती तर आरोपी तस्लीम काल्याची आई तायराबी शेख सलीम (40, जामनेर रोड, दिनदयाल नगर, भुसावळ) यांनी आपल्यावर रविवारी दुपारी तक्रारदाराच्या भावासह वडिलांनी चाकूहल्ला केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे तस्लीम काल्याने ज्या तक्रारदाराला लूटले त्याचे संशयीत आरोपी वडिल व भाऊ आहेत.
लूटीतील पैसे न दिल्याने केला चाकू हल्ल्याचा आरोप
आरोपी तस्लीम काल्याने रविवारी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास कालंका माता मंदिराजवळ बांधकाम व्यावसायीक मजूर आकाश प्रकाश थोरात (30, दिनदयाल नगर, भुसावळ) यास चाकूचा धाक दाखवत मारहाण करून दोन हजार रुपये लूटले होते तर या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता तर लूट प्रकरणातील आरोपी हा तायराबी शेख सलीम यांचा मुलगा असून आकाश थोरातचे वडिल प्रकाश थोरात व त्यांचा मुलगा अविनाश उर्फ छोटू थोरात (दिनदयाल नगर, भुसावळ) यांनी रविवार, 26 रोजी दुपारी अडीच वाजता तायराबी यांच्या घरी येवून शिविगाळ केली तसेच लूटीतील पैसे परत मागितले मात्र पैसे न दिल्याने अविनाशने सोबत आणलेल्या चाकूने तायराबी यांच्या उजव्या हातावर मारून दुखापत करीत पळ काढला. या प्रकरणी दोघा आरोपींविरोधात बाजारपेठ पोलिसात गुरनं.358/2022, भादंवि 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.