भुसावळात तापी पात्रात उडी घेवून एकाची आत्महत्या

0

भुसावळ : तापी पात्रात उडी घेवून 30 वर्षीय विवाहित पुरूषाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र शामराव भालेराव (32, राहुल नगर, भुसावळ) असे इसमाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. तापी पात्रावरून एकाने आत्महत्या केल्याचे कळताच पोहणार्‍यांनी नदीपात्रात धाव घेतली मात्र तो पर्यंत भालेराव यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे हवालदार मो.अली सैय्यद व कॉन्स्टेबल पराग सोनवणे यांनी धाव घेत मृत शवविच्छेदनासाठी हलवला. या प्रकरणी शहर पोलिसात रघुनाथ बाबूराव सपकाळे यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल नगरात वास्तव्यास असलेले भालेराव हे रोजंदारी करून प्रतिकुल परीस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा परीवार आहे. तपास हवालदार इब्राहीम तडवी करीत आहेत.