भुसावळात तापी पुलावरून एकाची आत्महत्या

0

अनोळखीची ओळख पटवण्यासाठी सोशल मिडीयावरून आवाहन

भुसावळ– तापी नदीच्या पुलावरून 55 वर्षीय ईसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मयत ईसमाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मिडीयावरून जनतेला आवाहन केले आहे. अकलूदचे पोलीस पाटील किरण वानखेडे यांच्या खबरीनुसार फैजपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.