भुसावळात तालुका वकील संघ अध्यक्षपदी अ‍ॅड.तुषार पाटील

0

भुसावळ- भुसावळ शहर व तालुका वकील संघाची निवडणुकीत अ‍ॅड.तुषार पाटील यांची तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली तर सचिवपदी रम्मू पटेल बिनविरोध निवडून आले. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीनंतर पंचरंगी लढतीत तुषार पाटील यांचा 48 मतांनी तर उपाध्यक्षपदासाठी धनराज मगर यांचा तीन मतांनी विजय झाला. सहसचिव पदासाठी पुरुषोत्तम पाटील (100) यांचा विजय झाला. महिला प्रतिनिधी पदाकरिता जास्वंदी भंडारी, निधी महाजन यांच्यात सरळ लढत झाली. यात जास्वंदी भंडारी यांना 184 मते मिळून विजय झाला तर प्रतिस्पर्धी निधी महाजन यांना 75 मते मिळाली. कोषाध्यक्ष पदासाठी राजेश कोळी व योगेश वाणी यांच्यात सरळ लढत झाली. यात राजेश कोळी यांना 144 मते मिळवून विजय झाला. ग्रंथपाल पदाकरिता संजय तेलगोटे यांचा 129 मते मिळवून विजय झाला तर प्रतिस्पर्धी मुकेश चौधरी (76) व योगेश वाणी (48) मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूपेश बाविस्कर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून विनोद तायडे, योगेश दलाल, धिरेंद्र पाल यांनी काम पाहिले.