भुसावळ- शहरातील सिध्दी विनायक कॉलनीतील रहिवासी तथा रेल्वेतील तिकीट तपासणीस राजेद्र देशपांडे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी 70 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. देशपांडे हे शनिवारी बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची चोरट्यांनी संधी साधली. देशपांडे हे रविवारी दुपारी 1.30 वाजता परत आल्यावर त्यांना घराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. घरातील कपाटाचा दरवाजा उघडून चोरांनी कपाटात ठेवलेले 45 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे आणि 25 हजार रूपये रोख असा एकूण 70 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी देशपांडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार दत्तात्रय चौधरी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, शहरात चोरटे सक्रिय झाली असून बंद घरांना टार्गेट केले जात असल्याने नागरीकांनी बाहेरगावी जाताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे तर नागरीकांनी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.