भुसावळात तिघा अज्ञात तरुणांचा गोळीबार, दोघे गंभीर जखमी, शहरात तणाव

शुक्रवारी मध्यरात्री भुसावळ हादरले

भुसावळ –  शहरापासून जवळ असलेल्या सकाळी पुलाजवळ तिघा अज्ञात तरुणांनी दोघांवर गोळीबार केला. या दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांची माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भुसावळ हिट लिस्टवर आले आहे. रात्रीच्या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस तिघा अज्ञात आरोपींच्या शोधत आहेत. या तिघा तरुणांनी दोघांवर गोळीबार करण्याचे कारण समजले नाही. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

काल शुक्रवारी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक शहरात रात्री उशिरापर्यंत शांततेत सुरू होत्या. दरम्यान, शहरापासून जवळच असलेल्या साकळी पुलावर तिघे तरुण जात होते. समोरून येणार्‍या तरुणांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. त्यात हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांची माहिती आहे.