भुसावळात दगडफेक करणार्‍या 11 तरुणांना पोलीस कोठडी

0

भुसावळ: भीमा-कोरेगाव घटनेनंतर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर भुसावळ येथे बहुजन समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर हिंसक जमावाने जामनेर रोडवरील काही दुकानांवर दगडफेक करहत दुचाकींसह लोटगाड्या उलथवल्या होत्या तर पांडुरंग टॉकीजसह खडका रोड भागात बसवर दगडफेक झाल्याने भुसावळ आगाराचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी स्वतंत्र दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या असून 11 तरुणांना अटक करण्यात आली होती. आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 6 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालय परीसरात मोठी गर्दी केली होती.