भुसावळात दगडफेक भावनेच्या भरात, चूक आम्हाला मान्य

0

आंबेडकरी चळवळीतील पदाधिकार्‍यांनी पत्रकार परीषदेत मागितली माफी

भुसावळ: बुधवारी आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी मूक मोर्चा काढून भीमा-कोरेगाव घटनेचा निषेध केला मात्र भावनेच्या भरात काही अल्पवयीन तरुणांनी बसेससह दुकानांवर दगडफेक केली, झालेली चूक आम्हाला मान्य आहे, आम्ही या प्रकाराची माफि मागतो, अशी माहिती सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पत्रकार परीषदेत दिली. गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परीषद झाली. आमच्यातील कोणत्याही नेत्याने चिथावणीखोर भाषण केलेले नाही, संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अप्रिय घटनांप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी एकमुखी मागणी सर्वांनी केली.