भुसावळात दातून विक्रेत्याची आत्महत्या

0

भुसावळ- रेल्वे स्थानकावर दातून (लिंबाच्या काड्या) विक्री करून उदर निर्वाह करणार्‍या योगेश ज्ञानेश्‍वर कुमावत (40, कवाडे नगर, भुसावळ) या इसमाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना 20 रोजी सायंकाळी लोखंडी रेल्वे पुलाजवळ घडली. या प्रकरणी रेल्वेचे ऑन ड्युटी डीवायएसएस यांनी खबर दिल्यावरून लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तपास एएसआय अनंत रेणुके करीत आहेत.