भुसावळ- दारूची बेकायदा वाहतूक करणार्या एकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यास अटक करण्यात आल. ध्यानदेव दत्तू नेमाडे (48, रा.कन्हाळे, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 19 रोजी सायंकाळी पावणेसात वाजता नाहाटा चौफुलीजवळून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून तीन हजार 540 रुपये किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील जोशी, विकास सातदिवे, रवींद्र तायडे, मंदार महाजन आदींनी ही कारवाई केली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.