तालुका विधी सेवा समिती उपक्रम ; वकीलांसह पक्षकांरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
भुसावळ- तालुका विधी सेवा समिती यांच्यामार्फे भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात दाव्यांच्या मध्यस्थीसंदर्भात (मेडीएशन अवेरनेस) बाबत शनिवार, 5 रोजी दुपारी दोन वाजता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 एस.पी.डोरले होते. जिल्हा न्या.पी.आर.सित्रे, सहदिवाणी न्यायाधीश बी.डी.पवार, सहदिवाणी न्यायाधीश पी.बी.वर्हाडे, दुसरे दिवाणी न्यायाधीश एम.एम.बवरे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश पी.ए.पाटील, चौथे सह दिवाणी न्यायाधीश एस.एल.वैद्य, सहावे सह दिवाणी न्यायाधीश पी.व्ही.चिद्रे उपस्थित होते. महिला व पुरूष वकील सदस्य व पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.
यांनी केले मार्गदर्शन
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड.एस.पी.अढाईंगे यांनी केले. कार्यक्रमास प्रशिक्षीत मध्यस्थ म्हणून सह दिवाणी न्यायाधीश बी.डी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.अशोक शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अॅड.प्रफुल्ल पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी किशोर पिंगाणे, कनिष्ठ लिपीक के.व्ही.कुळकर्णी यांनी सहकार्य केले.