28,000 cash looted from Yawal merchant in Bhusawal : Crime Against Sheikh Chand भुसावळ : दुचाकी घेण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या रेकॉर्डवरील शेख चाँद शेख हमीद याने 28 हजारांची रोकड लांबवल्याची घटना बुधवार, 5 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता नाहाटा चौफुलीजवळ घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी घेण्यासाठी बोलावून केली लूट
यावल येथील व्यापारी मोहम्मद सादीक मोहम्मद हमीद शेख (32, बाबूजीपूरा, यावल) यांच्याकडील दुचाकीची विक्री करायची असल्याने त्यांना संशयीत आरोपी शेख चाँद याने बुधवार, 5 रोजी नाहाटा चौफुलीवर बोलावले होते. दुचाकी घेवून आल्यानंतर आरोपीने मोहम्मद सादीक मो.हमीद शेख यांच्याशी झटापट करीत त्यांच्या खिशातील 28 हजारांची रक्कम लुटून पोबारा केला. तपास विजय नेरकर करीत आहेत.