भुसावळ- दुचाकी जाळून नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तुषार उर्फ बंटी अनिल जंजाळे (श्रीधर नगर, भुसावळ) यांच्या आईच्या नावावर असलेली दुचाकी (एम.एच.19 बी.एफ.1366) आरोपी मोहित विजय चौधरी (चमेली नगर) याने नेली होती. ती परत मागितल्याचा राग आल्याने मोहितसह त्याचे साथीदार अमोल काशीनाथ राणे, नीलेश चंद्रकांत ठाकूर व
मयूर राजेंद्र महाजन (दत्त नगर) याने 31 जुलै मध्यरात्री शहातील श्रीराम नगर, प्रल्हाद पंचर दुकानाच्या बाजूला सार्वजनिक जागी दुचाकी जाळून नुकसान केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.