भुसावळ- दुर्गा विसर्जनाच्या दिवशी भाविक तसेच मंडळांच्या पदाधिकार्यांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ टेंट हाऊस अॅण्ड डेकोरेटर्स ओनर्स असोसिएशनतर्फे पाणपोई उभारण्यात आली होती. उद्घाटन पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. थंडगार पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर भालेराव, उपाध्यक्ष किरण मिस्त्री, सचिव दिनेश राणे, खजिनदार संजय चौधरी, संजय लाहोटी, शोहेब खान, राजीव पारीख, ज्येष्ठ मंडप व्यावसायीक बाळासाहेब माहुरकर, नानकचंद जैन, अशोक चेलानी आदींची उपस्थिती होती.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमासाठी किशोर ढाके, राम माहुरकर, संदीप चौधरी, स्वप्नील साबळे, अजय साबळे यांचे सहकार्य लाभले. सुशील राणे, नारायण बर्हाटे, प्रकाश फेगडे, रमेश कांबळे, अरुण मोरे आदींनी परीश्रम घेतले.