भुसावळात दुसर्‍या दिवशीही मालगाडीचा डबा रूळावरून घसरला

0

रेल्वे वाहतुकीवर परीणाम नाही : रेल्वे यार्डातील घटना

भुसावळ- अप पाटलीपूत्र एक्स्प्रेसच्या इंजिनाचे चाक रूळावरून घसरल्याच्या घटनेला 24 तास होत नाही तोच शहरातील रेल्वेच्या यार्डात रविवारी सकाळी पुन्हा मालगाडीचे चाक घसरल्याची घटना घडली. या प्रकारामुळे रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परीणाम जाणवला नसलातरी सातत्याने होणार्‍या अपघातामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मालगाडीचे चाक रूळाखाली घसरल्यानंतर रेल्वे यार्डात सुमारे एक तासापेक्षा अधिक वेळ काम करून 7.30 वाजेच्या सुमारास मार्ग मोकळा झाला. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात एकच धावपळ उडाली. रेल्वे यार्डात अपघात झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अपघात राहत गाडी सुध्दा घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आधुनिक जॅकचा वापर करून रूळाखाली उतरलेला डबा पुन्हा रूळावर ठेवण्यात आला. या प्रक्रीयेस दीड तासांचा कालावधी लागला.